माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीरमाता, वीरपिता मेळाव्याचे आयोजन

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत खेड तालुक्यात काढसिद्धेश्वर मठ, तांबट (खोपी) येथे 7 मे रोजी, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज ऑफ आर्ट अँड कॉमर्स, आंबवली येथे दि. 8 मे रोजी आणि शिवतेज सेवाभावी संस्था, खेड येथे दि. 9 मे रोजी माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, विर नारी, विर माता, विर पिता यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

या मेळाव्यात पेन्शन विषयक, अभिलेख कार्यालय विषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येणार आहेत. मेळाव्यात येताना आपल्या सोबत डीस्चार्च पुस्तक, पीपीओ ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इसीएचएस कार्ड व आधार कार्डशी लिंक असेलेला मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. तरी या मेळाव्यास माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, विर नारी, विर माता, विर पिता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment