पंचायत समितीचे माजी उपसभापती मोहन आंब्रे यांचा अपघाती मृत्यू

Team RatnagiriLive
1 Min Read

खेड : खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि तालुक्यातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व, श्री. मोहन आंब्रे यांचे मंगळवारी रात्रीच्या सुमारास  चिरणी गावानजीक दोन दुचाकींच्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे खेड तालुक्यावर शोककळा पसरली असून, सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

मोहन आंब्रे हे खेड तालुक्यात एक परिचित नाव होते. खेड पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळे ते नेहमीच जनतेच्या स्मरणात राहतील. दिवंगत मोहन आंब्रे हे लोटे येथे वास्तव्याला होते.

    Share This Article
    कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
    Leave a Comment