सिंधुदुर्गात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

Team RatnagiriLive
1 Min Read

कणकवली : सावंतवाडी- वेंगुर्ला- दोडामार्ग- मालवण-कुडाळ येथील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षाला बळकट करण्यासाठी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.

शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक यावेळी पार पडली. दौऱ्याबाबत सर्वांना महत्वाच्या सूचना ना. सामंत यांनी यावेळी दिल्या.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे व संजय पडते, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हा प्रमुख निता सावंत, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, रुपेश पावसकर, वेंगुर्ला महिला तालुका प्रमुख दिशा शेटकर, उपजिल्हाप्रमुख सुनिल दुबे, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment