देवरूखच्या द्रोण हजारेसह गुंजन खवळे यांची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

Team RatnagiriLive
1 Min Read

देवरूख (सुरेश सप्रे) : महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन द्वारे घेण्यात आलेल्या 56व्या कॅरम स्पर्धेमध्ये पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या कु. द्रोण हजारे व पाध्ये स्कूलची गुंजन खवळे यानी उत्तुंग यश प्राप्त केल्याने त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करणेत आली .

राज्यात देवरूख हे कॅरमपटूची पंढरी मानले जाते. या शहरातून अनेक कॅरमपटूंची कारकीर्द घडली. तोच वसा पुढे नेत कु. द्रोण हजारे व कु. गुंजन खवळे यांनी शालेय स्तरावर ठसा उमटवत तालुकास्तरापासून यांनी ते राष्ट्रीय स्तरापर्यंत कॅरम स्पर्धेतील त्याची कामगिरी अतिशय उत्तम प्रकारे बहरत असून आता ते राष्ट्रीय कॅरमस्पर्धेत आपला ठसा उमटवून देवरूखची परंपरा जोपासत आहेत, अशा विश्वास व्यक्त होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याचे निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.


गुंजन ही कॅरम व्यतिरिक्त गायन, वाचन, पेंटिंग अशा क्षेत्रात ती सदैव अग्रेसर असते. त्या दोन्ही युवा कॅररमपटूचे माजी मंत्री रविंद्र माने, महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आ. सुभाष बने रत्नागिरी जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत. तालुका कँरम असोसिएशनचे सुरेंद्र देसाई. दिलिप विंचू. दत्ता नार्वेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment