नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत पशुसंवर्धन लाभासाठी १४ पर्यंत मुदतवाढ

Team RatnagiriLive
2 Min Read

अलिबाग : नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचा गट, शेळी गट, एक दिवसाची सुधारित जातीच्या कोंबडीची पिले वाटप, मांसल कुकूट पक्षांसाठी 1 हजार फूट शेड या विविध योजनांचे (50टक्के-75टक्के अनुदान) ऑनलाईन अर्ज करण्याची दि.14 जानेवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.


ऑनलाईन अर्ज स्वीकारणे, दि.13 डिसेंबर 2022 ते दि.14 जानेवारी 2023 पर्यंत एकूण दिवस/कालावधी 33 दिवस, डाटा बॅकअप करणे, दि.15 व दि.16 जानेवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 2 दिवस, रॅंडमायझेशन पध्दतीने लाभार्थी प्राथमिक निवड, दि.17 ते दि.21 जानेवारी 2023 पर्यंत एकूण दिवस/कालावधी 5 दिवस, राखीव, दि.22 जानेवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, मागील वर्षी तसेच या वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे, दि.23 ते दि.30 जानेवारी 2023 पर्यंत एकूण दिवस/कालावधी 8 दिवस, राखीव, दि.31 जानेवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 1 दिवस,
पशुधन विकास अधिकारी (वि), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करुन निवड पूर्ण करणे, दि.1 ते दि.8 फेब्रुवारी 2023 पर्यंत एकूण दिवस/कालावधी 8 दिवस, राखीव, दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रूटी पूर्तता, दि.10 व दि.11 फेब्रुवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 2 दिवस, कागदपत्रे अंतिम पडताळणी, दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, राखीव, दि.13 फेब्रुवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 1 दिवस, अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी एकूण दिवस/कालावधी 1 दिवस.


संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.रत्नाकर काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.श्यामराव कदम यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment