मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव, रत्नागिरी येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत दि. २४ जून २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. वृक्षारोपण कार्यक्रमाची मोहीम राबविण्यात आली. या महाविद्यालयाने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही मोहीम हाती घेतली. डॉ. आशिष सुरेश मोहिते व डॉ. स्वप्नजा आशिष मोहिते यांच्या हस्ते महाविद्यालयातील परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली.


या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयाच्या आवारात आणि परिसरातील मोकळ्या जागेत विविध ठिकाणी एकूण ५५ वृक्षांची लागवड केली. त्यात प्रामुख्याने नारळ, कोकम, अशोक, बदाम, गुलमोहर, इ. विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरण संतुलित ठेवणे, हवेची गुणवत्ता सुधारणे, परिसराचे सौंदर्य वाढविणे आणि विद्यार्थ्यांना निसर्गाची जाणिव करून देणे हा होता.


या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष सुरेश मोहिते यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. महाविद्यालातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव, श्री. निलेश मिरजकर, श्री. रोहित बुरटे, श्री. सुशिल कांबळे आणि बोट स्टाफ व इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी/विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment