मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे खेडमध्ये जोरदार स्वागत!

Team RatnagiriLive
1 Min Read

खेडचच्या राजा’ चे घेतले दर्शन

खेड : भाजपा नेते, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांनी खेड शहरातील वैभव खेडेकर यांच्या ‘खेडचा राजा’ या सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट दिली.

यावेळी खेडमध्ये वैभव खेडेकर यांनी ना. नितेश राणे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मोठा हार क्रेनच्या माध्यमातून त्यांना घालून फटाक्यांच्या अतिशबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. शहरातील छ. शिवाजी महाराज चौकात भाजपचे बॅनर लावून परिसर भाजपमय झाल्याचे खेडवासियांना पहावयास मिळाले.ना. राणे यांनी ‘खेडचा राजा’ चे दर्शन घेतले.मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ना. राणे यांनी ‘खेडचा राजा’ चे दर्शन घेतले.मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment