रत्नागिरी सिलिंडर स्फोट होऊन घराला ; तिघेजण जखमी

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : शहरातील उद्यम नगर भागातील शेट्ये नगरमध्ये बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घराला आग लागून घरातील तीन सदस्य जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घरातील सिलिंडरचा स्फोट होऊन झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

शेटेनगर सिलेंडरचा स्फोट होऊन घराचा काही भाग कोसळला आहे. स्फोटाच्या या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार सिलेंडरचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात असले तरी यामागील नेमके कारण तपासले जात आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment