डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक संदिप येलये व प्राध्यापक वृंदानी दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या प्रतिमेस व संविधानाच्या उद्देशिकेस पुष्पहार अर्पण केला.


या नंतर कु.आदित्य जोशी या विद्यार्थ्याने प्रास्ताविकेचे वाचन केले. विद्यार्थी मनोगतामध्ये प्रास्ताविकेचे महत्त्व,संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार या द्वारे आपली मते व्यक्त केली.
तसेच अध्यक्षीय मनोगतात प्रा येलये सर यांनी भारत हा प्रजासत्ताक देश आहे तसेच न्याय स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये विद्यार्थ्यांना पटवून सांगितली.

राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सामाजिक व आर्थिक न्याय मिळवणे हे उद्दिष्ट तसेच न्यायालयात अंमलबजावणी करण्यास बाध्य नाहीत ही तत्वे विद्यार्थ्यांना सांगितले.

तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष वाणिज्य ची विद्यार्थिनी कु.सुप्रिया चौगुले हिने केले तर आभार प्रदर्शन प्रथम वर्ष वाणिज्य चा विद्यार्थी कु आशिष शिर्के यांनी केले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment