चिंचखरी फाटकवाडी येथे २ डिसेंबरपासून दत्त जयंती उत्सव

Team RatnagiriLive
1 Min Read
रत्नागिरी: शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी येथे २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ या कालावधीत दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता दत्तयागाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल. बुधवार दि. ०३ डिसेंबर रोजी सकाळी १०:४५ वाजता आरती, सकाळी ११:०० वाजता अखंड नामजपाची सुरुवात होणार आहे. गुरुवार दि. ०४ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता नामजपाची सांगता होईल. दुपारी १२:३० नंतर महाप्रसाद होईल. सायंकाळी ०५ वाजता ह.भ.प. कौस्तुभ फाटक यांचे दत्त जन्माचे किर्तन होईल. सायंकाळी ०६:०० वाजता दत्त जन्म होईल त्यानंतर महाप्रसाद होईल.
शुक्रवार दि. ०५ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता तुळशी व फुले सहस्रनाम पादूकांवर वाहणे, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद होईल. सायंकाळी ०६:०० वाजता श्री सत्यनारायण पुजा, सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद, सायंकाळी ०८:०० ते रात्रौ ९.००वा. श्री सोमेश्वर भजन मंडळ, भडे लांजा यांची भजन सेवा होईल. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन फाटक कुटुंबीयांनी केले आहे.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment