वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवा सदन’चे रविवारी उद्घाटन

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी, दि. १२ :  जिल्हा व सत्र न्यायालय येथील वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवा सदन’ या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते रविवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा न्यायालय परिसरात होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव हे आहेत. या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment