Aprant Ratna | ॲड. मिलिंद साठे यांना ‘लोटिस्मा’चा ‘अपरांतरत्न’ पुरस्कार

Team RatnagiriLive
1 Min Read

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्र यांच्या वतीने दिला जाणारा ‘लोटिस्मा’चा “अपरांतरत्न” (aprant Ratna) पुरस्कार, महाराष्ट्र शासनाने नुकतेच महाधिवक्ता म्हणून नियुक्ती केलेल्या ॲड. मिलिंद साठे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या शनिवारी (दि. २७) समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

महाराष्ट्राचे कोकणातील पहिले महाधिवक्ता 

विशेष म्हणजे हा सन्मान लाभलेले मिलिंद साठे हे अपरांतभूमीतील पहिले व्यक्तिमत्त्व आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. बाबासाहेब परुळेकर यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या या गौरव सोहळ्याचे अध्यक्षस्थान चिपळूणच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे भूषविणार आहेत. या अभिमान सोहळ्याप्रसंगी ज्या व्यक्ती आणि संस्था यांना ॲड. मिलिंद साठे यांचा सत्कार करायचा आहे त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९०६७३७५७३८ येथे संपर्क साधावा.

या विशेष समारंभास बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोटिस्मा’ वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment