दिल्लीतील कर्तव्यपथावर होणार चिपळूणच्या कला-कर्तृत्वाचा गौरव!

Team RatnagiriLive
2 Min Read
  • कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या ‘वंदे मातरम्’ सादरीकरणासाठी मांडकी- पालवण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

चिपळूण :  २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीतील कर्तव्यपथ (राजपथ) येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या दिमाखदार सोहळ्यात यावर्षी चिपळूणच्या कलेचा आणि कर्तृत्वाचा गौरव होणार आहे. ‘वंदे मातरम्’ या विशेष सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून झालेल्या निवड चाचणीतून, महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघात कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील चतुर्थ वर्षाचा कु. दिनार संजय नेरुरकर तसेच द्वितीय वर्षाचा कु. सुजल शितल वाडकर यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली.

गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी ही आपले कोकणा मधील चिपळूणचे श्री सागर अंकुश कुंभार हे महाराष्ट्र टीम मॅनेजर म्हणून दिल्ली येथे काम पाहणार आहेत, ही संपूर्ण कोकण विभागासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या घवघवीत यशाबद्दल राज्याचे उद्योगमंत्री ना. श्री. उदय सामंतजी तसेच चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शेखरजी निकम यांनी विद्यार्थ्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी या चमूला दिल्लीतील अंतिम सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या यशात कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम तसेच प्राचार्या डॉ.शमिका चोरगे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.सराव आणि जिद्दीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी आपली निवड सार्थ ठरवली असून, दिल्लीच्या राजपथावर महाराष्ट्राचा डंका नक्कीच गाजेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment