Sports | रत्नागिरी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेडशी तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंची निवड

Team RatnagiriLive
115 Views
1 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि तायक्वांदो संघ रत्नागिरी यांच्या सहकार्याने आयोजित १९ वी जिल्हास्तरीय खुली तायकांदो स्पर्धा ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल मारुती मंदिर येथे संपन्न होणाऱ्या स्पर्धेसाठी खेडशी तायक्वांदो क्लबचा संघ जाहीर करण्यात आला.

ही स्पर्धा सब जुनियर कॅडेट ज्युनिअर आणि सीनियर या गटानुसार खेळवली जाणार असून तसेच स्पर्धा प्रामुख्याने क्युरोगी (फाईट), पुंमसे आणि फ्रीस्टाइल पुमसे तीन या प्रकारात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेकरिता प्रशिक्षक म्हणून अमित जाधव आणि प्रतीक पवार  मार्गदर्शन करणार आहेत.

या स्पर्धेनिमित्त रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि खेडशी तायक्वांदो क्लबच्या सर्व पदाधिकारी, समस्त पालक वर्ग यांनी सर्व खेळाडूंना यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment