जवाहर नवोदय विद्यालय ७ फेब्रुवारी रोजी प्रवेश परीक्षा

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : इयत्ता नववी व अकरावीमधील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय परीक्षा 7 फेब्रुवारी रोजी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पडवे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी या परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 1.45 वाजेपर्यंत होणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करुन घेउन परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता आपली उपस्थिती नोंदवावी.

प्रवेशापत्रा शिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय प्राचार्य एस. बसवराज यांनी केले आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment