दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ९ व १० मे २०२६ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२६, सिझन ९ स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील अनेक सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.
ही सायकल स्पर्धा १ ते २०० किमी अंतराची असून ५० किमी कोस्टल सिनिक रुट, ४ ते २०० किमी शॉर्ट सिटी लूप, १ व २ किमी फन राईड अशा गटात होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शॉर्ट सिटी लूप मार्गावर ७५, १००, १२५, १५०, १७५, २०० किमी सायकल चालवणाऱ्या दापोली आणि मंडणगड तालुक्यातील स्थानिक स्पर्धकांना प्रत्येकी ३००, ४००, ५००, ६००, ७००, ८०० रोख रक्कम बक्षिस असेल. शिवाय इतर काही खास बक्षिसे पण असतील. ५० किमी कोस्टल सिनिक रुट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते आसूद, सालदुरे, पाळंदे, बायपास रोड, आंजर्ले पूल, अडखळ, पाजपंढरी, हर्णै, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल.
फन राईड विनामूल्य असून इतर राईड साठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी लिंक https://www.townscript.com/e/dsc9 आहे. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७, ९०२८७४१५९५ हे आहेत. सर्वांनी सराव सुरु करा आणि आपल्या कुटुंबियांसमवेत यामध्ये सहभागी होत जास्तीच जास्त अंतर सायकल चालवा असे आवाहन करण्यात आले आहे.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ९ व १० मे २०२६ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२६, सिझन ९ स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील अनेक सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.