कोकण रेल्वेची प्रवाशांना गुड न्यूज!

Team RatnagiriLive
2 Min Read
  • उन्हाळी सुट्ट्यांसाठी मडगाव-पनवेल दरम्यान उद्या धावणार ‘समर स्पेशल’ ट्रेन

रत्नागिरी : उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांना होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मडगाव जंक्शन ते पनवेल दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक ‘समर स्पेशल’ ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग:

१. गाडी क्रमांक ०११०६ (मडगाव जंक्शन – पनवेल साप्ताहिक विशेष):

ही गाडी रविवार, १० मे २०२६ रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० (४:३० PM) वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:०० वाजता पनवेल स्थानकावर पोहोचेल.

२. गाडी क्रमांक ०११०५ (पनवेल – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष):

परतीच्या प्रवासात ही गाडी सोमवार, ११ मे २०२६ रोजी पनवेल येथून पहाटे ०५:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:१० (६:१० PM) वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

गाडीचे मुख्य थांबे:

​ही विशेष ट्रेन प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. यात प्रामुख्याने:

  • ​करमळी, थिविm, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली.
  • रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या स्थानकांचा समावेश आहे.

कोचची रचना (Composition):

​या विशेष ट्रेनला एकूण २३ डबे असतील, ज्याची विभागणी खालीलप्रमाणे आहे:

  • AC ३ टियर: ०३ कोच
  • स्लीपर क्लास: ११ कोच
  • जनरल (साधारण): ०७ कोच
  • SLR डबे: ०२

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, गाड्यांच्या सविस्तर वेळापत्रकासाठी त्यांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा कोकण रेल्वेचे अधिकृत ‘KR Mirror’ ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment