- रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक
रत्नागिरी : रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात विधान परिषद सदस्यपदी अनिकेत सुनील तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी आज त्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.
यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, ॲङ बंटी वणजू आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी पुष्पगुच्छ देवून विधानपरिषद सदस्य श्री. तटकरे यांचा यावेळी सत्कार केला.
