- ३० कोटींचे क्रीडा संकुल; अवकाळीग्रस्त आंबा, काजू बागायतदार
- जागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत
- ८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख जनतेसमोर मांडला. विमानतळ, पर्यटन, रोजगार आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांचा यात समावेश होता. रत्नागिरीला (Ratnagiri) जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने, सहभागाने माझ्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ९८ कोटी ४४ लाख रुपये जमा झाल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. एकूण ५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाल्याचे ते म्हणाले.
