रत्नागिरी : नांदेड–सावंतवाडी गणपती विशेष रेल्वेला यशस्वी पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे. या विशेष गाडीच्या रूपाने इतिहासात पहिल्यांदाच मराठवाडा – कोकण जोडणारी थेट गाडी धावणार आहे मराठवाडा प्रवासी महासंघ तसेच कोकण विकास समिती यांच्या या गाडी संदर्भातील मागणीला खासदार डॉ. शिवाजी काळगे, ओमराजे निंबाळकर व डॉ. अजित गोपछडे यांचा पाठपुरावा लाभला तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही रेल्वेकडे पत्रव्यवहार केला.
मराठवाडा प्रवासी महासंघ तसेच कोकण विकास समिती यांच्या या गाडी संदर्भातील मागणीला खासदार डॉ. शिवाजी काळगे, ओमराजे निंबाळकर व डॉ. अजित गोपछडे यांचा पाठपुरावा लाभला तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही रेल्वेकडे पत्रव्यवहार केला.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील प्रवाशांना कोकणाशी थेट रेल्वे जोडणी मिळावी, या मागणीला अखेर यश आले आहे असून गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील प्रवाशांना कोकणाशी थेट रेल्वे जोडणी मिळावी, या मागणीला अखेर यश आले आहे असून गाडी कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे
या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे ०७६५९ नांदेड–सावंतवाडी आणि ०७६६० सावंतवाडी–नांदेड विशेष गाडी मंजूर झाली आहे.
ही विशेष रेल्वे नांदेड, परभणी, परळी, लातूर, धाराशिव परिसरासह संपूर्ण मराठवाड्याला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाशी थेट जोडणारी महत्त्वाची सेवा ठरणार आहे.
