जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची महाडच्या प्रसिद्ध चवदार तळ्याला भेट

Team RatnagiriLive
1 Min Read

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले अभिवादन

रायगड विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या किल्ल्यावरील विविध विकासकामांची केली पाहणी

अलिबाग : रायगड जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी महाड तालुक्यातील चवदार तळे येथे शुक्रवार, दि.27 जानेवारी रोजी भेट देऊन महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई, सुधीर शेठ हे उपस्थित होते. याशिवाय जिल्हाधिकारी डॉ.म्हसे यांनी महाड प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय येथेही भेट दिली.


त्याचबरोबर रायगड विकास प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या रायगड किल्ल्यावरील विविध विकासकामांची जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी शनिवार, दि.28 जानेवारी रोजी पाहणी केली. या दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे सपत्नीक दर्शनही घेतले.


यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव सौ.स्वाती म्हसे-पाटील, महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, कार्यकारी अभियंता महेश नामदे, सहाय्यक अभियंता श्री. स्वप्निल बुर्ले, रायगड विकास प्राधिकरणाचे श्री.वरुण भामरे आदि उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment