राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ रवाना

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेसाठी रत्नागिरीचा संघ रवाना झाला आहे. दि. 12 ते 14 फेब्रुवारी 23 रोजी वर्धा येथे थे ही स्पर्धा होत आहे.

राज्यस्तरीय 5 व्या तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीतून गणराज तायक्वांदो क्लबची त्रिशा मयेकर आणि एसआरके तायक्वांदो क्लबचे सार्थक चव्हाण,आदिष्टी काळे यांचा संघ रवाना झाला आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने तायक्वांदो स्पोर्ट असोसिएशन, नाचणगाव, देवळी, वर्धा आयोजित ही स्पर्धा लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल, फुलगाव, वर्धा येथे होणार आहे.

त्रिशा मयेकर
आदिष्टी काळे
सार्थक चव्हाण


स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना राज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश बारगोजे, उपाध्यक्ष विनायक गायकवाड आणि धुलीचंद मेश्राम, अतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, महासचिव मिलिंद पाठारे, सचिव सुभाष पाटील, खजिनदार व्यंकटेश कररा यांनी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना एस आरके तायक्वांदो क्लबचे शाहरुख शेख तसंच गणराज तायक्वांदो क्लबचे प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत यांचं मार्गदर्शन लाभल आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment