पद्मश्री दादा इदाते यांच्या सन्मानार्थ दापोलीत निघाली सायकल फेरी

Team RatnagiriLive
1 Min Read

दापोली सायकलिंग क्लबचा उपक्रम

दापोली : निस्वार्थीपणे सामाजिक कार्यात सक्रिय, अनेक प्रतिष्ठेच्या पदांवर काम केलेले, अनेक सत्कार, पुरस्कारांनी सन्मानित कोकणचे रत्न भिकू रामजी इदाते (दादा) यांना केंद्र सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दादांच्या या समाजकार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.

सायकल फेरीत सहभागी झालेले सायकलपटू

आझाद मैदानातून सुरु झालेली सायकल फेरी रुपनगर- ऐश्वर्यनगर- श्रीगुरुनगर- लष्करवाडी जालगाव- गणेशनगर- आनंदनगर- उदयनगर- आझाद मैदान अशा ६ किमी मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. यादरम्यान आंनंदनगर जालगाव येथे दादांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले. त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यात आले. दादांनी बालपणीचे आणि शालेय जीवनातले अनुभवही सांगितले. हसतखेळत अनेक विषयावर मार्गदर्शनात्मक गप्पा झाल्या.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात आमोद बुटाला, केतन पालवणकर, सर्वेश बागकर, संदीप भाटकर, विनय गोलांबडे, प्रशांत पालवणकर, श्रीराम इदाते इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment