चिपळूणच्या लो. टिळक ग्रंथालय संग्रहालयाला मिळाली दोन हजार वर्षपूर्व नाण्यांची भेट!

Team RatnagiriLive
126 Views
1 Min Read

कोकणावरील सर्व राजवटींच्या नाण्यांचा संग्रह होणार

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या संग्रहालयाला नुकतीच, महाराष्ट्रातील विनायक निजसुरे, गणेश नेणे, प्रशांत ठोसर, शैलेश मुळे, संदीप निजसुरे, गौरव लवेकर या नामवंत नाणी संग्राहकांनी भेट दिली. त्यांनी संग्रहालयासाठी दोन हजार वर्षपूर्व पासून ते सोळाव्या शतकापर्यंतची नाणी भेट दिली. यात मोर्यकाल, सातवाहन, कुशन, विश्नुकुंडी, वाकाटक, मुरुड-जंजिरा संस्थान अशी विविध कालखंडातील नाण्यांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर वाचनालयाने, इतिहासात कोकणावर जेवढ्या राजवटी झाल्या त्या सर्वांची नाणी या असावीत यासाठीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नाणी संग्रहकांनी वाचनालयाच्या संग्रहालयातील वस्तू तसेच नाणी पाहून समाधान व्यक्त केले. संस्थेने साकारलेल्या कलादालनातील तैलचित्रांची माहिती घेवून यापुढे आम्ही ग्रंथालयाच्या संग्रहालयाला सर्वोतोपरी साहाय्य करणार असल्याचे नाणी संग्रहकांनी सांगितले. कोकणात इतके भरीव कार्य करणारी लोटिस्मा संस्था अभिमानास्पद असल्याचेही संग्रहकांनी सांगितले.

ग्रंथालयाचे कार्यवाह विनायक ओक यांनी सर्वांना चिपळूण १९४२ हे पुस्तक भेट दिले. संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच संग्रहालय पुन्हा सुरु होणार असल्याचे ओक यांनी यावेळी सांगितले.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment