संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात फुलांची आकर्षक आरास

Team RatnagiriLive
1 Min Read

हजारो भाविकांनी घेतले दर्शन

रत्नागिरी : महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात रविवारी श्रावण वद्य चतुर्थी ( संकष्टी चतुर्थी ) निमित्त फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती.

गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात संकष्टी चतुर्थी दिनी भाविकांचा नेहमीच ओघ पाहायला मिळतो. रविवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रींच्या मंदिरात गाभाऱ्यासमोर विविधरंगी फुलांची नेत्रसुखद अशी आरास केली होती.

दरम्यान, संकष्टी चतुर्थीनिमित्त दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले. रविवारी वातावरण मोकळे असल्यामुळे दूरवरून आलेल्या अनेक भाविकांनी मंदिरालगतच्या चौपाटीवर फिरण्याचा मनसोक्त आनंद घेतला.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment