कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या पोरबंदर एक्सप्रेस ला जादा डबा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांची गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

गणेशोत्सवामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना प्रचंड गर्दी झाली. अजूनही गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू आहे. या मार्गावरील वाढलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दिनांक 28 सप्टेंबरच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या फेरीसाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment