कोकणातून धावणारी उद्याची जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस रद्द

Team RatnagiriLive
1 Min Read

वसई, पनवेल, रत्नागिरी, मडगाव मार्गे जाते तिनेलवेलीला

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी 23 डिसेंबर 2023 रोजी सुटणारी जामनगर ते तिरूनेलवेली ही दूर पल्ल्याची एक्सप्रेस गाडी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून वसई, पनवेल, रत्नागिरी मार्गे ही गाडी दक्षिणेतील तिरुनेलवेलीला जाते.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या टोकाकडून येणारी गाडी रद्द झाल्यामुळे जामनगर ते तिरूनेलवेली (19578) ही दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी प्रवास सुरू होणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

सुरत, वापी, बोईसर, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव मार्गे ही गाडी दक्षिणेतील तिरुनेलवेलीला जाते. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस कोकण रेल्वे मार्गे धावते.

तिरुनलवेलीकडून जामनगरकडे येणारी गाडी रद्द झाल्यामुळे 23 डिसेंबरची जामनगर येथून तिरुनेलवेलीला जाणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment