रत्नागिरी : शिवसेना,भाजप राष्ट्रवादी पक्षाची समन्वय बैठक आज गुरुवारी रत्नागिरी शहरातील माळनाका येथे राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पडली.

बैठकीस चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आ.शेखर निकम, दापोलीचे आ. योगेश कदम, मा.आ.प्रमोद जठार, समनव्यक तथा उपनेते सदानंद चव्हाण, राजेश सावंत, शशिकांत चव्हाण,बाबाजी जाधव, सुरेश मयेकर तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेली ही बैठक तिन्ही पक्षांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होती. परस्परांमध्ये समन्वय ठेवून येत्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. जिल्हाभरातून तिन्ही पक्षांचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी या समन्वय बैठकीला उपस्थित होते.
