आरवलीतील दुसऱ्या बाजूचा सर्व्हिस रोडही झाला काँक्रिटचा; वाहतुकीसाठी लवकरच होणार खुला!

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामातील आरवली येथील उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे. उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडच्या दुसऱ्या बाजूचे काँक्रिटीकरणाचे कामही आता पूर्णत्वाकडे चालले आहे. लवकरच दुसऱ्या बाजूच्या सर्व्हिस  रोडवरून वाहतूक देखील सुरू होणार आहे.

आरवली येथील बाजारपेठेमधील महामार्गावरील सर्विस रोडचे एकाच बाजूचे काँक्रिटीकरण्याचे काम पूर्ण झाले होते तर दुसरी बाजू तशीच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल की नाही, अशी साशंकता निर्माण झाली होती. मात्र, त्यांनी ग्रामस्थांनी याबाबत माध्यमांमार्फत आवाज उठवल्यानंतर महामार्ग ठेकेदार कंपनीने दोन-तीन दिवसांपूर्वी हे काम सुरू केले आहे.

सर्व्हिस  रोडच्या काँक्रिटीकरण कामाचे गती पाहता पुढील काही दिवसात हे काम पूर्ण होऊन रत्नागिरी चिपळूण दिशेच्या सर्विस रोडवरून देखील वाहतूक सुरू होईल. सध्या चिपळूण- रत्नागिरी दिशेने सर्विस रोडवरून वाहतूक काँक्रीट करण्याचे काम या आधीच पूर्ण झाल्यामुळे सुरू आहे. तर रत्नागिरी चिपळूण मार्गावरील आरवली येथून होणारी सर्व प्रकारची वाहतूक उड्डाणपूल मार्गे होत आहे. यामुळे या ठिकाणी चढउतार करणाऱ्या प्रवाशांना उड्डाणपूल संपल्यानंतर मुख्य बाजारपेठेपासून लांब उभे राहावे लागत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment