मडगाव जनशताब्दी, सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसने प्रवास करणार आहात तर माहित असू द्या

Team RatnagiriLive
1 Min Read

कोकण रेल्वे मार्गावर ९ फेब्रुवारीला अडीच तासांचा मेगाब्लॉक

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर दि. ०९/०२/२०२४ (शुक्रवार) रोजी ०९:०० ते ११:३० या वेळेत आडवली – आचिर्णे विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी ०२:३० तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मेगा ब्लॉकमुळे रेल्वे सेवेवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन

गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्स्प्रेसचा प्रवास 09/02/2024 रोजी सुरू होणारा सावंतवाडी रोड – कणकवली विभागादरम्यान 90 मिनिटांसाठी रोखून ठेवला जाईल.

गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. 09/02/2024 रोजी सुरू होणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी स्थानकावर 10 मिनिटांसाठी रोखून ठेवला जाईल.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment