कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना खुशखबर!

Team RatnagiriLive
1 Min Read

पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेसला जादा डबा जोडणार

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या पोरबंदर ते कोचुवेली एक्सप्रेसला स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावरील सर्वच गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार पोरबंदर ते कोचुवेली मार्गावर धावणाऱ्या (20910) या गाडीला दिनांक 22 फेब्रुवारी रोजीच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर (20909) या फेरीसाठी दि. 25 रोजी च्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून

अतिरिक्त डबा जोडण्याच्या रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीवर तिकिटे असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment