KONKAN RAILWAY : पनवेल -रत्नागिरी मार्गावर आज रात्री ८.३० वा. लोकल धावणार !

Team RatnagiriLive
2 Min Read

रत्नागिरी : कोकण आणि मध्य रेल्वेच्या सहयोगाने ०११५८ चिपळूण -पनवेल / ०११५७ पनवेल -रत्नागिरी अशी संपूर्ण अनारक्षित असणारी ८ डब्यांची मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन चालवली जात आहे. ही गाडी दि. ४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाली असून ती ३१ मार्च २०२४ पर्यंत फक्त रविवारी धावणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ०११५७ चिपळूण येथून दुपारी ३:२५ ला सुटून पनवेल येथे रात्री ८:१५ ला पोहोचेल आणि ०११५७ पनवेल येथून रात्री ८:२५ ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

अशा आहेत वेळा….

चिपळूण -पनवेल मार्गावर सुटणार : दु. ३ वा. २५ मिनिटांनी

पनवेल स्थानकावर पोहचणार : रात्री ८ वा. १५ मिनिटांनी

पनवेल ते रत्नागिरी मार्गावर सुटणार : रात्री ८ वा. २५ मिनिटांनी

रत्नागिरी स्थानकावर पोहचणार : सोमवारी पहाटे ४ वाजता

०११५८ चिपळूण- पनवेल मेमूचे थांबे

अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे

०११५७ पनवेल-रत्नागिरी मेमूचे थांबे

सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment