रत्नागिरी पोलिस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर वृद्धाच्या खुनाच्या खळबळ

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : येथील पोलीस मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर वृद्धाचा डोक्यात चिऱ्याचा दगड किंवा तत्सम प्रकारची जड वस्तू घालून खून केल्याचे उघड झाले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.

रत्नागिरी येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर एका जुन्या कंपाउंडमध्ये येथील एका इमारतीत देखरेखीच्या कामाला असलेल्या वाडेकर नामक वृद्धाचा डोक्यात चिऱ्याचा दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. हा खून नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांची तपास यंत्रणा तात्काळ कामाला लागली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment