रत्नागिरी : द्वितीय प्रशिक्षण प्रक्रीया सुरळीत होण्याच्यादृष्टीने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण स्थळी पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. प्रशिक्षण स्थळी पोहोचवण्यासाठी व परत आणण्यासाठी एसटी बसेसच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
263 दापोली मतदार संघामध्ये दि.27 एप्रिल 2024 व 28 एप्रिल 2024 रोजी, 264 गुहागर मतदार संघामध्ये दि. 29 एप्रिल 2024 व 30 एप्रिल 2024 रोजी, 265 चिपळूण मतदार संघामध्ये दि. 28 एप्रिल 2024 रोजी, 266 रत्नागिरी मतदार संघामध्ये दि. 29 एप्रिल 2024 रोजी व 267 राजापूर मतदार संघामध्ये दि. 29 एप्रिल 2024 व 30 एप्रिल 2024 रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.
तृतीय प्रशिक्षण, मतदानाचे आदल्या दिवशी व मतदानाच्या दिवशीसुध्दा याप्रकारे एसटी बसेसच्या वाहतुकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबतच्या करारनामा एसटी महामंडळाशी करण्यात आलेला आहे.
निवडणूक प्रशिक्षण स्थळी पोहोचवण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment
Leave a Comment
