रसायन वाहतुकीचा टँकर उलटून महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर आंजणारी घाटात मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रसायन वाहतुकीचा टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर रांजणजीतच्या आंजणारी घाटात उलटलेलला टँकर.

मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा नजीक अपघातग्रस्त झालेला टँकर हटवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी तातडीने रवाना झाले होते.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment