‘नासा’ भेटीवरून आलेल्या विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून स्वागत

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्वागत केले.

ग्रामीण भागातील विद्र्यार्थ्यांनी अमेरिकेला जाणे ही बीग अचिव्हमेंट असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई आदी उपस्थित होते.

नाव, शाळेचे नाव,गावाच्या नावाची विचारणा करुन पालकमंत्रयांनी त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या. कुठं जाऊन आला, अमेरिकेत जाऊन काय पाहिले ?असे प्रश्न विचारुन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment