लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांना माजी आमदार मनोहर भोईर यांचे अभिवादन

Team RatnagiriLive
1 Min Read
उरण दि २४ (विठ्ठल ममताबादे ) : शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज, भूमिपुत्रांचे कैवारी, १९८४ च्या उरणच्या शेतकरी आंदोलनाचे प्रणेते, सर्वसामान्य जनतेचे कल्याणासाठी आपले आयुष्य अर्पण करणारे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त सोमवार दि. २४ जून रोजी शिवसेना (ठाकरे) पक्ष्याचे रायगड जिल्हाप्रमुख व उरण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांनी स्वर्गीय दि. बा. पाटील यांच्या पनवेल येथील संग्राम या बंगल्यावर जाऊन लोकनेते दि. बा. पाटील यांना उरण मतदार संघातील प्रकल्पग्रस्त जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
यावेळी स्वर्गीय दि. बा पाटील साहेबांचे सुपुत्र अतुल पाटील हेही उपस्थित होते. सदर वेळी स्वर्गीय दि बा पाटील साहेब यांच्या आठवणींना  उजाळा देण्यात आला, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी स्वर्गीय पाटील साहेबांबद्दल असलेला आदर व त्याने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment