ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

अरबी समुद्रालगत देशातील सर्वात मोठ्या शिवपुतळ्याचे  रत्नागिरीत लोकार्पण !

  • ढोल, ताशे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटाक्यांच्या आतषबाजीत अन् महाराजांच्या जयघोषात शिवपुतळ्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


रत्नागिरी, दि. 7 : ढोल, तासे, तुतारीचा निनाद, नेत्रदीपक फटक्यांची आतषबाजी, उपस्थितांच्या साक्षीने आणि महाराजांच्या जयघोषात, जल्लोषात अरबी समुद्राच्या बाजूला असणाऱ्या देशातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या पुतळ्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.


या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मुख्याधिकारी तुषार बाबर, राजन शेट्ये, बिपीन बंदरकर आदी उपस्थित होते.


सुरुवातीला फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करुन रत्नदूर्ग शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्टॕचू गॅलरीची पाहणी केली. तेथून कळ दाबून पालकमंत्री श्री. सामंत यांनी समोर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले आणि उपस्थितांनी एकच जयघोष केला. यावेळी डोळ्याचे पारणे फेडणारी नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
पालकमंत्री श्री. सामंत यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, कोकणातील सर्वात मोठ्या असणाऱ्या या शिवसृष्टीचे आज लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे. दोन महिन्यात ही परिपूर्ण शिवसृष्टी पहायला मिळेल. अरबी समुद्राच्या बाजूला देशातला सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उभा पुतळा आहे. जे जे स्कूल ऑफ ऑर्टच्या पथकाला मनापासून धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button