Youth Festival | मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात लांजाची चमकदार कामगिरी

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवा महोत्सव २०२४ (रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभाग) मध्ये लांजा न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजाच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली आहे.

मुंबई विद्यापीठ स्तरावरील या युवा महोत्सवात राज्यातील विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे यश मिळाले आहे :

  • कु. सादिया जावेद नाकाडे , बी-कॉम ३, मेहंदी स्पर्धा – प्रथम क्रमांक
  • . कु. सानिया उदय यादव, बीए. १, मराठी कथाकथन स्पर्धा – तृतीय क्रमांक
  • . कु. मृण्मयी अविनाश पठारे , बी-कॉम, अकाउंट ऍंड फायनान्स, वक्तृत्व स्पर्धा – मराठी विभाग – तृतीय क्रमांक.

यशस्वी तिन्ही विद्यार्थिनींचे आणि सांस्कृतिक विभागाचे न्यू एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
यामध्ये मार्गदर्शक म्हणून सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सचिन घोबले, प्रा. प्रदीप कदम, प्रा. विशाखा पावसकर, प्रा. अंकिता शिर्के यांनी जबाबदारी पार पाडली.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment