महापुरुषांना अभिवादन करून केला गृहप्रवेश!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • आगळ्या-वेगळ्या गृहप्रवेशाची सर्वत्र चर्चा

उरण दि ३० (विठ्ठल ममताबादे ) : ‘हेच आमचे गुरु इथूनच आमचे अस्तित्व सुरु’ असे ब्रीद वाक्य उराशी बाळगून स्वर्गीय जनाबाई मारुती नागू म्हात्रे यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते समीर रामचंद्र म्हात्रे रा. पागोटे-उरण यांच्या नवीन घरात गृहप्रवेश महापुरुषांना विनम्र अभिवादन करून करण्यात आला.

यावेळी सर्व मान्यवर, नातेवाईक, मित्र परिवार सहकुटुंब उपस्थित होते. सर्वांनी समीर म्हात्रे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज अनेक ठिकाणी विविध धार्मिक विधी करून गृहप्रवेश केला जातो. मात्र, समीर म्हात्रे हे पुरोगामी विचाराचे असल्याने त्यांनी आधुनिक युगाचा विचार करत, समाजात प्रबोधन करण्याच्या दृष्टीकोनातून महापुरुषांना अभिवादन करत गृहप्रवेश केला.

समीर म्हात्रे या गृह प्रवेशाची सर्वत्र चर्चा होत आहे. एक चांगला धाडसी व उत्तम निर्णय घेतल्याने समीर म्हात्रे यांच्या निर्णयाचे, कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment