धाराशिव दौऱ्यात ना. नितेश राणे यांनी घेतले श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन!

Team RatnagiriLive
1 Min Read
  • भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत

धाराशिव : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे धाराशिव दौऱ्यावर आहेत. दौऱ्यासाठी धाराशिव विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ना. नितेश राणे यांचे स्वागत केले

यावेळी धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन जोरदार स्वागत केले तर ना. राणे यांनी तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

तुळजाभवानीच्या दर्शनाने मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment