मूळच्या झारखंडमधील तरुण कामगाराची रत्नागिरी आत्महत्या

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : शहरातील पेठ किल्ला येथे मुळच्या झारखंडमधील कामगाराने तो राहत असलेल्या घरी गळफास लावून आत्महत्या के केल्याचे घटना घडली. मंगळवार दि. १७ जून रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
अरमानकुमार नरेश तुरी (२०, मूळ रा. झारखंड सध्या रा. पेठ किल्ला, रत्नागिरी ) अरमानकुमार हा येथील एका कंपनीमध्ये कामाला होता. मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घराच्या बाराच्या सुमारास गळफास घेतला. ही बाब शहर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment