लोकशाहीर विठ्ठल उमप संगीत स्मृती समारोहात मृदगंध पुरस्कार वितरण

Team RatnagiriLive
1 Min Read

मुंबई : विठ्ठल उमप फाउंडेशन आयोजित १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व मृदगंध पुरस्कार २०२३ चे वितरण राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अभिनेते दिलीप प्रभावळकर, गायक सुदेश भोसले,अभिनेत्री केतकी माटेगावकर, अनुराधा भोसले, चिन्मयी सुमित, अभिनेते सुमित राघवन, आतांबर शिरढोणकर यांना ना. उदय सामंत व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, संयोजक नंदेश उमप, सरिता उमप आदी उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment