तळवडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी ओंकार माने झाला सी. ए.

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : लांजा तालुक्यातील तळवडे येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी ओंकार गोपीनाथ माने (कुरचुंब) हा C.A. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

वडील हयात नसतानाही चुलते यांचे सहकार्य तसेच ओंकारची इच्छाशक्ती, चिकाटी, प्रचंड मेहनत, अभ्यासूपणा यामुळे हे यश प्राप्त झाले. तळवडे येथे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ओमकार याने वाणिज्य शाखेतत शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेसाठी मेहनत घेतली. पार्टटाइम नोकरी करून ओंकारने चार्टर्ड अकाउंट परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण केली.

ओंकार याच्या या यशाबद्दल तळवडे शैक्षणिक संस्थेची अध्यक्ष आनंद पेडणेकर आणि माजी मुख्याध्यापक रामचंद्र जाधव, भीमराव खोत, आजी मुख्याध्यापक धोंडबा पाटील तळवडे विकास विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सामाजिक कार्यकर्ते विजय पाटोळे, यांनी यांनी अभिनंदन केले आहे

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment