लांजातील जि. प. शाळा क्र ५ कडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा : लांजा शहरातील लांजा नंबर ५ या जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने विद्यार्थ्यांना चालणे मोठी कसरत करावी लागत आहे.

संबंधित यंत्रणा अद्यापही या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. दरम्यान, एका पालकानेच या रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी काल चिरा आणून ठेवला आहे. लांजा साठवली तिठा ते पत्की डॉक्टर दवाखाना हा जिल्हा परिषद मार्ग आहे. या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. हा मार्ग वाहनांची मोठी रेलचेल असते लांजा शहरातील लांजा नंबर 5 ही मॉडेल स्कूल आहे. या शाळेत मोठी विद्यार्थी पटसंख्या आहे. शालेय वेळेत या रस्त्यावर विद्यार्थी पालक यांची मोठी गर्दी असते पावसाळ्यात हा रस्ता अत्यंत वाहन चालविणे धोकादक झाले आहे.

या मार्गावर वाहनांची कोंडी झाल्याने विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील पालकांनी हा रस्ता तातडीने सुस्थितीत करावा, अशी मागणी करत आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment