रत्नागिरी जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ आॕगस्टला

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी, दि. २९ : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. माहे ऑगस्ट 2024 चा लोकशाही दिन सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दु.1 ते 2 वा. या वेळेत होणार आहे.

लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करु शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) शुभांगी साठे यांनी कळविले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment