‘योध्दा कर्मयोगी’ पुस्तक प्रेरणादायी : उद्योग मंत्री उदय सामंत

Team RatnagiriLive
1 Min Read

ठाणे : योद्धा कर्मयोगी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रेरणादायी ठरेल असे गौरवपूर्ण उद्गार राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काढले.

गडकरी रंगायतन, ठाणे येथे ग्रंथाली प्रकाशन आयोजित “योध्दा कर्मयोगी” या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित चरित्र ग्रंथाचे बुधवारी प्रकाशन संपन्न झाले.

यावेळी महामहिम राज्यपाल सीपी.राधाकृष्णन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा.डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेले ‘योध्दा कर्मयोगी’ हे पुस्तक शिंदे साहेबांच्या कार्याला उजाळा देणारे, प्रेरणादायी आहे. हे पुस्तक शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खोलवर अभ्यास करणारं आहे,असेही यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment