लांजा-राजापूरमधून महायुतीचे उमेदवार किरणसामंत यांना विजयी करण्यासाठी भाजप भटके-विमुक्त आघाडी मैदानात

Team RatnagiriLive
1 Min Read

महायुतीचे उमेदवार किरण सामंत प्रचंड बहुमताने विजयी होतील : नीलेश आखाडे

लांजा : लांजा राजापूर मतदारसंघांमध्ये भारतीय जनता भटके आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी सर्व वाड्या वस्त्यावर जात महायुतीचे उमेदवार किरण उर्फ भैया यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे विनंती केली.
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीच्या माध्यमातून आजपर्यंत देण्यात आलेला तांडा-वस्ती निधी, धनगर वाड्यांवरती झालेली विकास कामे, गावागावांमध्ये करण्यात आलेली विकास कामे, लाडकी बहीण योजना, तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या योजना यांची माहिती देत प्रचाराचा धडाका लावला आहे.

यावेळी भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांच्यासह, उपाध्यक्ष अनंत खरात, भटके विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष महेंद्र शेंडे, योगेश झोरे, अमन मकवाना, शिवसेनेचे योगेश कांबळे, रोहन सावंत, आदि. महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी झाले होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment