रत्नागिरीच्या गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थ्यांची गोवा विधानसभेला क्षेत्रभेट

Team RatnagiriLive
2 Min Read

जी जी पी एस प्रशालेतील कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाचा उपक्रम

रत्नागिरी : चालू शैक्षणिक वर्षात शहरातील जी.जी.पी.एस. प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाची इयत्ता दहावीची शैक्षणिक क्षेत्रभेट सहल दिनांक 27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे आयोजित केली होती. विद्यार्थ्यांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून गोवा दर्शन घडवणे हा या सहलीमागचा उद्देश होता.

सहलीच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी ‘बोंडोला येथील प्राणीसंग्रहालय पाहिले . तसेच या दिवशी श्री. विजय जोशी यांनी विद्यार्थ्यांना पंचकोशाधारित जीवनशैली या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी गोवा सायन्स सेंटर व प्लॅनेटोरियम आणि भारतातील सर्वात जुने सार्वजनिक वाचनालय असलेल्या गोवा स्टेट लायब्ररीला भेट दिली. हे आशियातील सर्वात मोठे वाचनालय आहे. सहलीच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थी गोवा विधानभवन पाहण्यास गेले. विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव खूपच अविस्मरणीय होता.

विद्यार्थ्यांनी श्री अनंत देवस्थान, श्री महलसा नारायणी मंदिर, श्री विजयादुर्गा मंदिर अशी काही प्राचीन मंदिरेही पाहिली. शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गोव्यातील नेस्ले कंपनी च्या चॉकलेट बनवणार्या भारतातील एकमेव फॅक्टरीलाही भेट दिली

यावेळी विद्यार्थ्यांसोबत श्री. वासुदेव परांजपे, श्री.अमोल पाष्टे, श्रीम. श्रद्धा टिकेकर हे शिक्षक सहभागी झाले होते.

र. ए .सोसायटीच्या अध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांची गोवा विधानभवन भेटीसाठी विशेष मदत झाली .

संपूर्ण उपक्रम गुरुकुल प्रकल्प प्रमुख श्री. नितीन लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जी. जी.पी .एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सोनाली पाटणकर आणि र. ए.सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment