गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी : सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी गोंविदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दहा वाजता मल्टीपर्पज हॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व विद्यार्थी व सर्व प्राध्यापकांचे स्वागत करण्यात आले. प्रा .डी व्ही बोकडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले डॉ. एस आर दिवाळे यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग विविध उदाहरणाचे. दाखले देत कुमार श्रीकांत शिंदे, कुमारी अक्षता शेटये, ग्रंथपाल विनायक कांबळे व प्राध्यापक बोकडे यांनीही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेल्या त्यागाची विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांमध्ये संविधान जागरूकता राहण्यासाठी आवाहन केले

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .एस् आर दिवाळे यांनीही विद्यार्थ्यांना परिवर्तनाची कशाप्रकारे गरज आहे हे विविध प्रकारची उदाहरणे देत व कथेद्वारे पटवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. अनिल कांबळे यांनी सर्व उपस्थित. प्राध्यापक व विद्यार्थी यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली . अशा प्रकारे डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती महाविद्यालयामध्ये अतिशय उत्साहात संपन्न झाली .

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment